ram jagdale pune

१ एप्रिल १९८१ साली राम यांचा जन्म झाला. वडिलांचे गाव करमाळा व आईचे गाव बार्शी. गेल्या ३ पिढ्यांपासून राम व त्यांचे कुटुंबिय पुणे येथे वास्तव्यास आहेत. जिद्द, चिकाटीच्या जोरावर एक यशस्वी समाजसेवक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.

गोरगरिबांसाठी काहीतरी चांगले काम करायचे या जाणिवेतून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. सामाजिक जीवनात मिळविलेल्या यशाचा काहीतरी खारीचा वाटा आपण समाजाला द्यायला हवा. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या तळमळीतून अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास राहण्यापासून ते सर्वोतोपरी मदत केली.

लहानपणा पासून खेळाची आवड असल्याने खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कुस्त्यांच्या, क्रिकेटच्या स्पर्धाचे आयोजन करून लाखो रुपयांच्या बक्षिसांचे वाटप केले. ग्रामीण भागातील बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरीत नोकरी महोत्सवाचे आयोजन करून अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. मागील गेली अनेक वर्षापासून आषाढी वारीमध्ये हजारो वारकर्यांना उत्कृष्ठ महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

लहानपणा पासून समाजसेवेची आवड असल्यामुळे आपल्या सभोवतालचे सर्व सुखी व्हावे, सर्वाना चांगले शिक्षण मिळावे. लोकांच्या अडीअडचणी सोडविणे यासाठी मनापासून प्रयत्न करणे हीच ईश्वरसेवा मानून आपण करत राहायचे...बाकी तडीस न्यायला स्वामी समर्थ पाठीशी आहेतच.

सामाजिक जबाबदारी (पदभार)

अध्यक्ष – नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र

अध्यक्ष – नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र

पूर्ण माहीती वाचा
अध्यक्ष - उजनी धरण परिसर शेतकरी बचाव कृती समिती

अध्यक्ष - उजनी धरण परिसर शेतकरी परिषद

पूर्ण माहीती वाचा
मार्गदर्शक – जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र

मार्गदर्शक – जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र

पूर्ण माहीती वाचा

© , Shri. Ram Jagdale